ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बलात्कारी बाबा राम रहिमला १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

रोहतक, दि. २८ (वृत्तसंस्था) - विशेष सीबीआय न्यायालयाने साध्वी बलात्कार प्रकरणातील दोषी राम रहीम याला आज दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याच्या शिक्षेवर आज रोहतक तुरुंगातच सुनावणी झाली. रोहतक आणि सिरसासह पूर्ण राज्याला या अनुषंगाने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सीबीआयचे न्यायाधीश जगदीप सिंह राम रहीम याला शिक्षा सुनावण्यासाठी पंचकुलाहून रोहतक न्यायालयाकडे हेलीकॉप्टरने दाखल झाले. तसेच राम रहीमचे वकील एस के नरवाना आणि सीबीआयचे वकील एचसी वर्मा हे देखील रोहतक जेलमध्ये दाखल झाले.

राम रहीमच्या वकीलांनी दयेची याचना केली. राम रहीम समाजसेवक असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. तर सीबीआयच्या वकीलांनी राम रहीमला जन्मठेप सुनावण्याची मागणी केली. राम रहीमने न्यायाधीशांसमोर नाटके केली. सुरुवातीला न्यायाधीशांसमोर तो हात जोडून उभा राहिला. त्यानंतर तो रडू लागला. दरम्यान रोहतक जिल्हा कारागृहात राज्यभर उसळलेल्या हिंसा लक्षात घेऊन तात्पूरत्या स्वरुपात कोर्टरूम तयार करण्यात आले. न्यायमूर्ती जगदीप सिंह यांनी कोर्टरूममधूनच बलात्कारी राम रहीमला शिक्षा सुनावली आहे.