ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बलात्कारी बाबा राम रहीमच्या अडचणी अजून वाढणार

चंदिगड, दि. २९ (वृत्तसंस्था) - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमवर बलात्कारासोबतच हत्येचे दोन आरोप असून, १६ सप्टेंबर रोजी सीबीआय आपला शेवटचा युक्तिवाद करणार आहे. राम रहीम आणि सीबीआयच्या वकिलांनी हत्येच्या दोन्ही प्रकरणात आपली बाजू मांडल्यानंतर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान काल न्यायालयाने राम रहीमला बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

विशेष सीबीआय न्यायालयाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात पत्रकार राम चंदर छत्रपती यांच्या हत्याप्रकरणी तीन आठवड्यात सुनावणी पुर्ण करण्याचा आदेश दिला होता. राम रहीमविरोधातील बलात्कार प्रकरणाची पत्रकार राम चंदर छत्रपती यांनी चौकशी केल्याने तसेच पीडित साध्वीचे पत्र वृत्तपत्रात छापल्याने राम रहीमच्या आदेशानंतर डेराच्या लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्याप्रकरणातील सुनावणी देखील अंतिम टप्प्यात आहे.

सीबीआयची बाजू राम रहीमला बलात्कार प्रकरणी शिक्षा झाल्याने एकाप्रकारे भक्कम होण्यास मदत झाली आहे. याबाबत सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी राम रहीमच्या चरित्रासंबंधी युक्तिवाद केला जाईल. दरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात राम रहीमविरोधातील सुनावणी उशिराने करण्यात यावी यासाठी ६० हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाने सर्व याचिका सीबीआयच्या वकिलांनी विरोध केल्यानंतर रद्द केल्या होत्या. उच्च न्यायालयाकडून ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुर्ण करण्याचे ठरवले आहे.