ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

२ प्रकरणात बाबा रामपालसह १३ जणांची निर्दोष मुक्तता

चंदीगड, दि. २९ (वृत्तसंस्था) - हरियाणातील न्यायालयाने बाबा रामपालसह १३ जणांची प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. नरबळीसह एकूण आरोप या लोकांवर होते. न्यायालयाने त्यापैकी प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली. आरोपांमध्ये खून करण्याचे आदेश देणे, कटकारस्थान, पोलिसांच्या कारवाईत अडथळे आणणे आणि हिंसाचाराचे आरोप होते. हरियाणातील हिसार न्यायालयाने मंगळवारी पावणे तीनच्या सुमारास हा निकाल दिला आहे.

बाबा रामपालवर देशद्रोहाचा खटला सुद्धा सुरू असून २८ ऑगस्ट रोजी तो या प्रकरणी जेलमध्ये भरवलेल्या न्यायालयात हजर झाला होता. यावेळी डेरा सच्चा सौदा प्रमुखाचा फैसला सुनावला जात असल्याने ट्रेन आणि बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे, रामपालचे भक्त असलेले केवळ २१० आरोपी हजर होऊ शकले होते. इतर शेकडो आरोपी गैरहजर होते. न्यायालयाने गैरहजर राहणाऱ्या आरोपींचा फैसला सुनावण्यासाठी १८ सप्टेंबरची तारीख जाहीर केली. तसेच एकूणच सर्व आरोपींचा फैसला २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.