ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दहशतवादाशी धर्माला जोडणे चुकीचे – उपराष्ट्रपती नायडू

नवी दिल्ली, दि. ३१ (वृत्तसंस्था) - इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये आयोजित डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्मृती व्याख्यानमालेत बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दहशतवादाला कोणता धर्म नसतो, मात्र याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत जनतेमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. एखाद्या भाषेला विशिष्ट धर्माची भाषा म्हणून जोडणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.

नायडू म्हणाले, मुस्लिमांपेक्षाही कित्येक हिंदू लोक हे चांगली उर्दू भाषा बोलतात. कोणावरही एखाद्या भाषेला थोपता येत नाही. पहिल्यांदा हिंदी भाषा शिकणे गरजेचे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नायडूंनी प्रथम मातृभाषा शिकण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

तसेच कोणताच धर्म दहशवादाला नसतो, जनतेने हे समजून घ्यायला हवे. काही लोक दुर्दैवाने दहशतवादाला धर्माचे रूप देऊन लोकांना धर्माच्या नावाखाली भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ती एक सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. मात्र कोणताही धर्म दहशतवादाची शिकवण देत नसल्याचेही ते म्हणाले.