ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारत बनला आशिया खंडातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी देश

नवी दिल्ली, दि. १ (वृत्तसंस्था) - देशाच्या पंतप्रधानांना वेळोवेळी अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये ना खाऊंगा ना खाने दूंगा, असे बोलताना पाहिले असेल किंवा बघितले असेल. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा मुद्दा मोदींच्या अजेंड्यावर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान होता. पण त्याबाबतीत मोदींनी जे यश अपेक्षित होते ते त्यांना अद्याप तरी मिळालेले नाही. आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी नुकतीच फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. आशिया खंडातील देशांमध्ये भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. याबद्दलचे सर्वेक्षण ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून करण्यात आले होते.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्वेक्षणातून भारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे समोर आले असून या सर्वेक्षणात भारतापेक्षा शेजारी असलेले देश चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने म्हटले आहे. तब्बल ६९ टक्के भ्रष्टाचाराचे प्रमाण भारतात असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आल्यामुळे मोदींना देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असल्यास अजून बरेच प्रयत्न करावे लागतील, असे दिसून येते.