ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

राजीवकुमार यांनी स्वीकारला नीति आयोग उपाध्यक्षपदाचा पदभार

नवी दिल्ली, दि. २ (वृत्तसंस्था) - नामवंत अर्थतज्ञ राजीवकुमार यांनी नीति आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. गेल्या महिन्यापासून हे पद अरविंद पनगढिया यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त होते. राजीवकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुढील तिमाहीमध्ये आर्थिक वृद्धीदर ते . पर्यंत उभारण्याची आशा व्यक्त केली आहे. यंदा झालेला चांगला मान्सून, मजबूत आर्थिक पायाभरणी, परकीय गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राची प्रभावी कामगिरी याला कारण ठरेल, असेही मत त्यांनी मांडले आहे. तर पहिल्या तिमाहीमधील आर्थिक वृद्धी दरातील घट होण्याला नोटाबंदी कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजीवकुमार यांनी नीति आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, जुलै ते सप्टेंबर या दुस-या तिमाहीमध्ये जीडीपी ते . टक्क्यांपर्यंत वधारेल. जीएसटीची होत असलेली प्रभावी अंमलबजावणी, मजबूत आर्थिक पाया, सध्या झालेला चांगला मान्सून, परकिय गुंतवणुकीतील लक्षणीय वाढ आणि सेवा क्षेत्राची कामगिरी या बाबी त्याला कारण ठरतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.