ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री – निर्मला सीतारमण

नवी दिल्ली, दि. ४ (वृत्तसंस्था) - केंद्रीयमंत्री मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर निर्मला सीतारमण या देशाच्या संरक्षणमंत्री झाल्या आहेत. त्या यापुर्वी देशाच्या वाणिज्यमंत्री होत्या. इंदिरा गांधी ज्यावेळी पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांच्याकडे संरक्षणमंत्र्यांलयाची जबाबदारी होती. त्यांनी स्वतःकडे या मंत्र्यालयाची जबाबदारी घेतली होती. इंदिरा गांधीनंतर निर्मला या देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री झाल्या आहेत.

वाणिज्यमंत्रीपदाच्या पहिले त्या वित्त कॅारपोरेट राज्यमंत्री होत्या. त्यांनी आपली जबाबदारी चांगली सांभाळली होती. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ता राहिलेल्या निर्मला या 2006 मध्ये भारतीय जनता पक्षात आल्या. भाजपच्या प्रवक्ता म्हणून काम करणाऱ्या निर्मला यांनी विविध प्रसारमाध्यमासमोर पक्षाची ध्येय-धोरण प्रभावीपणे मांडली होती.

आंध्रप्रदेशातील असलेल्या निर्मला यांनी 2014 च्या निवडणूकीच्या वेळी भाजपाच्या प्रवक्ता म्हणून, प्रधानमंत्री पदासाठी मोदी, हा संदेश खूप लोकप्रिय झाला होता. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या संरक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच मोदी यांनी निर्मला यांना संरक्षणमंत्री बनवून ही परंपरा तोडण्याचा प्रयत्न केला आहे.