ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

सबका साथ सबका विकास हा ब्रिक्सचा उद्देश - नरेंद्र मोदी

बीजिंग, दि. ४ (वृत्तसंस्था) - ब्रिक्स संमेलनाच्या उद्देश हासबका साथ सबका विकासआहे, असे प्रतिपादन पंतपंधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स संमेलनात केले. चीन येथे शियामन येथे ब्रिक्स संमेलनातील एका चर्चासत्रात मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, ब्रिक्स संमेलनातील सहभागी देशांनी दहशतवादाचा धिक्कार करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सैार उर्जा आणि विकासाच्या सर्व विषयात ब्रिक्स सद्स्य देशांनी एकमेंकाना मदत केली पाहिजे. शिक्षणाची प्रगती, विकासाचे नवे मार्ग शोधण्याची सध्या गरज आहे. वैश्विक बदल, सायबर सुरक्षा, डिजिटल वर्ल्ड साठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शांतता आणि विकासासाठी एकमेकांमध्ये सहकार्याची आवश्यकता आहे.
कृषी, संस्कृती, पर्यावरण, ऊर्जा, क्रीडा आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमधील आपण एकमेकांना सहकार्य करत आहोत.ब्रिक्ससहकार्यासाठी आधार बनली आहे. अनिश्चिततेकडे झुकणाऱ्या जगात स्थिरता आणि विकासासाठी ब्रिक्स महत्त्वाची ठरते आहे.
ब्रिक्समधील देश एकमेकांना भेटत आहेत. ज्यामुळे आपल्याला समजून घेणं अधिक शक्य होणार आहे. दारिद्र्यनिर्मूलन, आरोग्य, स्वच्छता, कौशल्य, खाद्यसुरक्षा, लैंगिक समानता, ऊर्जा आणि शिक्षण यांबाबतची धोरणंमिशन मोडमध्ये आहेत.
महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांमुळे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होते आहेकेंद्रीयबँकांच्या क्षमतेत आणखी वाढ करावी लागेल
.