ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सात हजार भारतीयांसह लाखोंना अमेरिकेत थारा नाही

वॉशिंगटन, दि. ६ (वृत्तसंस्था) - एकेकाळी अमेरिकेतघुसखोरीकरणाऱ्यांना आता अमेरिकेत थारा मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यासाठी ओबामांचा आणखी एक निर्णयही ट्रम्प यांनी रद्द केला आहे. या निर्णयामुळे हजार भारतीयांसह लाख लोकांना अमेरिकेतून बाहेर काढले जाणार आहे.

मात्र या निर्णयाची अंमलबजावणी लगेच होणार नाही. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तो टप्प्या-टप्प्याने लागू होणार आहे. विशेष म्हणजे, या निर्णयानंतर बेकायदा इमिग्रंट्स पुन्हा दिलासा मिळवण्यासाठी अर्ज देऊ शकणार नाही. आधीच दिलासा मिळालेल्यांची सवलत कायम राहणार आहे. परमिट समाप्त होत नाही, तोपर्यंत ते काम करू शकतील. मात्र, त्यांना मिळालेले संरक्षण पुढच्या वर्षी मार्च पूर्वी संपुष्टात येत असेल तर ते शेवटच्या वेळेस रिन्यू फॉर्म दाखल करू शकतात. मात्र, त्यांची मुदत मार्च रोजी संपुष्टात येत असेल तर ते रिन्यू करू शकणार नाहीत.

माजी राष्ट्राध्यक्ष ओबामांनी अमेरिकेत लहानपणी अवैधरीत्या आणलेल्या अनिवासींना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. तोच निर्णय ट्रम्प यांनी रद्द केला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध व्हाईट हाऊसच्या बाहेर आणि अमेरिकेत सर्वत्र निदर्शने केली जात आहेत.