ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चीन, पाकिस्तानसोबत युद्ध होऊ शकते – लष्करप्रमुख रावत

नवी दिल्ली, दि. ७, (वृत्तससंस्था) - भारताच्या सीमेवर कधीही संघर्ष होऊ शकतो. उत्तरेकडे चीन तर पश्चिमेकडे पाकिस्तान यांच्यासोबत युद्धाची शक्यता नाकारता येत नाही, असे भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी बुधवारी सांगितले. दोन्ही ठिकाणी युद्धासाठी तयार रहा, असे संकेतही रावत यांनी दिले आहेत.

चीनसोबतची तणावपूर्ण परिस्थिती गेल्या आठवड्यात समाप्त झाल्यानंतर रावत यांनी हे भाष्य केले आहे. डोकलाम येथे ७३ दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाचा उल्लेख करून रावत म्हणाले, उत्तरेकडे सीमेवरील परिस्थितीचे हळू- हळू संघर्षात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तान पण त्याचा फायदा घेऊ शकतो.

सेंटर फॅार वारफेयर स्टडीजतर्फे आयोजित एका परिसंवादात रावत बोलत होते. रावत म्हणाले, चीनने आपली ताकद दाखविणे सुरू केले आहे. त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. पाकिस्ताविषयी ते म्हणाले, पाकिस्तानसोबत कोणतीही शांतातपूर्ण चर्चा होऊ शकत नाही. आपण पाकिस्तानबरोबर किती दिवस असे शीतयुद्ध करणार आहोत.

पाकिस्तान आणि चीनसोबतच्या युद्धाबाबत यापूर्वीही असे विधान रावत यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत सीमावादांवर चर्चा करीत होते. तेव्हाही रावत यांनी अशाच प्रकारचे व्यक्तव्य केले होते.