ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

उत्तर प्रदेशात शक्तिपुंज एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून घसरले

सोनभद्र, दि ७ (वृत्तसंस्था) - भारतीय रेल्वेच्या मागे लागले अपघातांचे शुक्लकाष्ठ संपता संपत नाही आहे. आज उत्तर प्रदेशमधील सोनभद्रजवळ रेल्वे अपघात झाला असून हावडाहून जबलपूरकडे जाणाऱ्या शक्तिपुंज एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून घसरले आहेत. फफराकुंड परिसरात हा अपघात घडला असून दरम्यान कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

हावडाहून जबलपूरकडे जात असलेली शक्तिपुंज एक्सप्रेस फफराकुंड येथे अपघातग्रस्त झाली. या एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून खाली घसरले. याबरोबरच घटनास्थळावरील रुळाचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. दुर्घटनेची रेल्वे अधिकारी चौकशी करत असून मागील काही दिवसांतील हा तिसरा मोठा रेल्वे अपघात आहे. रेल्वे मंत्रालयाचा कारभार पीयूष गोयल यांनी सांभाळल्यानंतर हा पहिलाच रेल्वे अपघात आहे. यापूर्वी झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर सुरेश प्रभु यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता