ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मला नोटबंदीची थोडी देखील कल्पना नव्हती – रघुराम राजन

नवी दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) - केंद्र सरकारने वारंवार नोटबंदीची तयारी काही महिन्यांपासून करण्यात आली होती, असे सांगितले आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून नोटबंदीच्या महिनाभरआधी बाहेर पडलेल्या रघुराम राजन यांनी या निर्णयाबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे म्हटले आहे. मला कोणतीही कल्पना केंद्र सरकारच्या नोटबंदीची नव्हती. अमेरिकेतून मी स्वत: नोटा बदलून घेण्यासाठी भारतात आलो होतो, असे राजन यांनी म्हटले आहे.

लवकरच रघुराम राजन यांचे पुस्तक प्रकाशित होणार असून राजन याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना आपण काही भारतीय नोटा अमेरिकेत घेऊन गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. नोटबंदीचा निर्णय मी अमेरिकेत असताना जाहीर झाल्यामुळे मला जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मला भारतात यावे लागले असल्याचे राजन म्हणाले.

रघुराम राजन यांनी यावेळी पुन्हा एकदा आपण कधीही नोटबंदीचे समर्थन केले नसल्याचे अधोरेखित केले. नोटबंदी तात्कालिक स्थितीत चांगली वाटत असली, तरीही तिचे दीर्घकालीन फायदे कमीच आहेत. किंबहुना नोटबंदीमुळे भविष्यात फार काही सकारात्मक घडणार नाही, असे त्यांनी म्हटले.