ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

… तर गौरी लंकेश आज जिवंत असत्या – आमदार जीवराज

नवी दिल्ली, दि. (वृत्तसंस्था) - पत्रकार गौरी लंकेश हत्येचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पण या हत्या प्रकरणावर भाजपचे काही नेते वादग्रस्त वक्तव्ये करण्यात पुढे आहेत. गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत भाजप आमदार माजी मंत्री जीवराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

कर्नाटकमधील भाजप नेते डीएन जीवराज यांनी म्हटले, की संघातील लोकांच्या मृत्यूच्या जल्लोषावर गौरी लंकेश यांनी लिहिले नसते तर त्या आज कदाचित जिवंत असत्या. जीवराज यांनी म्हटले की, अनेक संघ कार्यकर्त्यांना काँग्रेस सरकारच्या काळात मारले गेले. गौरी लंकेश यांनी त्यावेळी संघाच्या विरोधात लिहिले. जर त्यांनी असे केले नसते तर आज त्या जिवंत असत्या.

जीवराज यांनी म्हटले की, संघ कार्यकर्त्यांना आम्ही काँग्रेसच्या सत्ताकाळात मरताना पाहिले आहे. परंतु त्या आरोपींविरोधात सिद्धरामय्या सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. ते म्हणाले, की गौरी लंकेश माझ्या बहिणीप्रमाणे आहेत. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी भाजप संघाविरोधात लिहिले आहे, ते योग्य नाही.