ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बापरे ! कलेच्या नावावर काय वाट्टेल ते.....

लंडनची प्रसिद्ध आर्टिस्ट पॉपी जॅकसनने कलेच्या नावावर जो नवीन प्रयोग केला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. गॅबल ऑफ टॉयनबी स्टुडिओच्या छताच्या भींतीवर पॉपी जॅकसनने चक्क चार तास विवस्त्र अवस्थेत बसून होती. तिची या अवस्थेतील छायाचित्रे रॅक्वएल रोड्रिगुएज या फोटोग्राफरने क्लिक केली आहेत. त्यानंतर ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.

ही छायाचित्रे क्लिक झाल्यानंतर जॅकसनने आपल्या वेबसाइटवर म्हटले, की या आर्टच्या माध्यमातून लोक स्त्रीचे शरीर बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात, हे मला जाणून घ्यायचे होते. जॅकसनने पहिल्यांदाचा असा प्रयोग केलेला नाही, यापूर्वीही तिने असे विवस्त्र परफॉर्मन्स दिले आहेत.