ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पंजाबमधील एका मंदिराची मालकी चक्क कुत्र्यांच्या नावावर

पतियाळा, दि. २६ (प्रतिनिधी) - पंजाब राज्यातील पटियाळापासून वीस किलो मीटर अंतरावर असलेल्या एका डेर्‍याची (मंदिराची) मालकी गेली २०० वर्षे कुत्र्यांकडे आहे. पतियाळाच्या तत्कालीन महाराजांनीच या मंदिराची जमीन कुत्र्यांना दान दिली होती. 

त्यामुळे आजही येथील प्रमुख पुजारी सकाळी सकाळी मंदिराबाहेर येऊन कुत्र्यांसारखे आवाज जोरजोरात काढतात. आवाज ऐकताच आसपासची कुत्री गोळा होतात. मग त्या कुत्र्यांना खायला घातले जाते. कुत्र्यांना खायला घातल्याशिवाय पुजारी स्वतः खात नाहीत. या मंदिरातील भितींवर असलेल्या अनेक चित्रांत देवदेवतांसोबत कुत्रीही चितारली गेली आहेत.

या संदर्भात सांगितले जाते की, हा डेरा जिथे आहे, तिथे पूर्वी जंगल होते. तिथे एक साधू आला. जंगलातील या डेर्‍यातच त्याने वास्तव्य केले. तो दिवसातून तीन वेळा कुत्र्यांसारखा आवाज काढून कुत्र्यांना बोलवीत असे आणि त्यांना खायला घालत असे. 

जेव्हा पतियाळाच्या महाराजांना याबद्दल समजले तेव्हा ते या साधूच्या भेटीला आले व त्यांनी साधूला कांही जमीन दान देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा साधूने ही जमीन कुत्र्यांच्या नावाने द्यावी असे महाराजांना सुचवले. त्यानुसार ही जमीन कुत्र्यांना दिली गेली. तेथपासून ही जमीन कुत्र्यांच्या मालकीची समजली जाते. महसूल विभागातही या जमिनीची तशीच नोंद आहे.