ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

भावा-बहिणीच्या अनोख्या नात्यावर भाष्य करणारा "सिंड्रेला"

>> ४ डिसेंबरपासून सिनेमागृहात प्रदर्शित होणार 
>> अभिनय कट्ट्याच्या कलाकारांचा "सिंड्रेला"
>> अभिनय कट्ट्याच्या किरण नाकतीचे सिने दिग्दर्शन आणि निर्मितीत पदार्पण!!

ट्टा म्हणजे चार चौघात रंगलेल्या बेसुमार गप्पा, पण कट्ट्याची ही व्याख्या बदलायला भाग पडणारा असा अभिनय कट्टा. एक चळवळ म्हणून सुरु केलेल्या या कलेच्या बिजांकूराचा आज वटवृक्ष झाला आहे तो फक्त मायेनं अन आस्थेनं सिंचन करत राहिलेल्या कट्ट्याच्या सुत्राधारांमुळे म्हणजेच किरण नाकती यांच्यामुळे.

नाट्य व चित्रपट सृष्टीत पदार्पण करत असताना, एक नवोदित कलाकार म्हणून स्वत:च स्थान निर्माण करत असताना, येणारी सारी आव्हाने पेलत; मालिका, चित्रपट, आणि पडदयाआड कार्यभार सांभाळत एक यशस्वी व्यक्तित्व साकारले. पण ‘कुठेतरी या प्रवासाला किमान दुसऱ्यांसाठी सुकर करता आले तर....’ या प्रयत्नातून अभिनय कट्टा जन्माला आला.

दर रविवार न चुकता कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ नि रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कलाविष्काराची मेजवानी सादर करत ६००० हूनही जास्त पात्रं रंगवत, २४८ कट्ट्याचा विक्रम या अभिनय कट्ट्याने केला. ठाणेकरांसमवेत संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी रविवारची एक सुखद संध्याकाळ अनुभवयाला सुरुवात केली.

तसेच हा कट्टा पत्रकारांच्या लेखणीची पसंती बनला. प्रख्यात दिग्दर्शकांच्या नि सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या कौतुकाला पात्र ठरला. कलाकारांची पंढरी, मूल्यांना व संस्कुतीला जपत फक्त कलाकार नव्हे तर माणूस घडवणारी संस्था अशी ओळख अभिनय कट्ट्याने निर्माण केली.

अवघ्या पाच वर्षात नाट्य क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहचलेला कट्टा आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हे अभिनय कट्ट्याचे कलाकार फक्त थिएटर आर्टिस्ट न राहता सिने आर्टिस्ट बनणार आहेत कारण अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या आणि ओम श्री संकल्प फिल्म प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘सिंड्रेला’ या आगामी सिनेमात जास्तीत जास्त कलाकार हे अभिनय कट्ट्याचे आहेत. यावेळी कट्ट्याचे हे विद्यार्थी फक्त पडद्यावरील कलाकार म्हणूनच नव्हे तर पडद्यामागेही यशस्वी भूमिका सांभाळताना दिसतील.

"सिंड्रेला" या वैशिष्ठ्यपूर्ण सिनेमाचे शिल्पकार हे किरण नाकती आहेत. हा सिनेमा फक्त अभिनय कट्ट्यालाच नवी ओळख देणार नसून, कट्ट्याचे लाडके संचालक, गुरु व सूत्रधार श्री किरण नाकती यांच्या व्यक्तित्वाचेही नवे पैलू समोर घेऊन येत आहे. सदर सिनेमाची कथा आदित्य हळबे व किरण नाकती यांनी लिहिली असून पटकथा, संवाद व  दिग्दर्शक या तिन्ही बाजूही त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळल्या आहेत.

"सिंड्रेला" या सिनेमाच्या नावातच या सिनेमाचे वेगळेपण दडलेले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. सिनेमाची कथा ही आपल्या सर्वांच्या जवळची असून "खरी कथा की परी कथा" हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पहावा लागणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता मंगेश देसाईने एक उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादू ही आपल्याला पहायला मिळणार आहे.

याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून आशिष म्हात्रे यांनी उत्कृष्टरित्या या सिनेमाचे संकलन केले आहे. मुरलीधर गोडे, ओमकार मंगेश दत्त, निकेत चौधरी यांनी लिहिलेल्या भावपूर्ण गीतांना किरण- गौरव या नव्या दमाच्या संगीतकारांनी श्रवणीय असे संगीत दिले आहे. पंकज पडघन यांनी या सिनेमाचे पार्श्वसंगीत केले असून सिनेमाचे थीम सॉंग ही त्यांनी स्वरबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, नंदेश उमप आणि गायिका आर्या अंबेकर यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत

तर असा हा भावा-बहिणीच्या अनोख्या नात्यावर भाष्य करणारा "सिंड्रेला" सिनेमा येत्या ४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.