ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गोपीनाथ मुंडेंची संघर्षयात्रा ११ डिसेंबरला पडद्यावर

सतोड कामगाराचा मुलगा ते देशाचा ग्रामविकासमंत्री अशी झेप घेणाऱ्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील "संघर्षयात्रा' हा चित्रपट ११ डिसेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित होत आहे. मुंडेंचा जन्मदिवस १२ डिसेंबरला असल्याने त्याच्या आदल्या दिवशी हा चित्रपट पडद्यावर आणून ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्स व भाजप चित्रपट युनियनतर्फे या दिग्गज नेत्याला आदरांजली वाहिली जाईल. राज्यातील १५० सिनेमागृहांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, असे निर्मात्यांनी सांगितले.

संघर्ष यात्रा सिनेमात अभिनेता शरद केळकर हा गोपीनाथ मुंडेंच्या भूमिकेत दिसणार आहे, तर श्रुती मराठे पंकजा मुंडेंची भूमिका करत आहेत. ओमकार कर्वे हे प्रमोद महाजनांच्या भूमिकेत दिसणार असून प्रीतम कागणे या प्रीतम मुंडे साकारतील. साकार राऊत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शित केले असून चित्रपटाची कथा, पटकथा व संवादाची जबाबदारी विराज मुळ्ये व विशाल घार्गे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, औरंगाबाद, भगवानगड या परिसरात झाले आहे. कथा, अभिनय, तांत्रिक बाबींद्वारे चित्रपट अधिक वास्तववादी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सूर्यकांत बाजी, मुकुंद कुलकर्णी, राजू बाजी आणि संदीप घुगे हे या चित्रपटाचे निर्माते असून संदीप घुगे हे भाजप चित्रपट युनियनचे अध्यक्षही आहेत. सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार करण्यात आला असून गोपीनाथरावांच्या संघर्षयात्रेमधून राज्यातील तरुणांना निश्चित प्रेरणा मिळेल, असा विश्वास निर्माते संदीप घुगे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे गाणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या चित्रपटात गाणे गायले असून त्यांचे हे पहिलेच पार्श्वगायन आहे. सिनेमात दोन गाणी असून दुसरे गाणे हे आदर्श शिंदेंचे आहे. मंदार चोणकर, शाहीर मोरेश्वर मेश्राम यांनी लिहिलेल्या गीतांना श्रीरंग युऱ्हेकर व अनिरुद्ध जोशींनी संगीत दिले आहे.