ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सेक्सी गर्ल फ्रॉम चायनामध्ये सनी लिओन

नी लिऑन काय चीज आहे, हे आपल्याला आता चांगलंच कळून चुकलंय. शॉर्ट फिल्मपासून सिनेमापर्यंत तिचे बहुरंगी, बहुढंगी अवतार आपण पाहिलेत. हीच 'हिट अँड हॉट' सनी आता आणखी एका सेक्सी व्हिडिओतून चाहत्यांना घायाळ करायला येतेय.

'सेक्सी गर्ल फ्रॉम चायना' या व्हिडिओ साँगमध्ये सनी 'सुपर सेक्सी गर्ल' झाली आहे. कनिका कपूर आणि मिका सिंग यांनी गायलेल्या या गाण्यातून एक मजेशीर कथा उलगडत जाते.

शांतनु माहेश्वरी टेक सॅव्ही तरुण गीकच्या भूमिकेत आहे. त्याचे मित्र त्याच्यासाठी चीनहून एक डॉल मागवतात. ही बाहुली दुसरी-तिसरी कुणी नाही तर सनी लिऑन आहे.

गीक या डॉलला चार्जिंग प्लग जोडतो. चार्जिंग झाल्यावर ती काय करणार याबद्दल त्याला उत्सुकता असते. ही डॉल आपल्याशी गप्पा मारेल, आपलं मनोरंजन करेल असं गीकला वाटत असतं. पण सनी अजूनही बरंच काही करण्यासाठी आलीय. दहा तास 'चार्ज' झाल्यानंतर ती आपलं 'खरं रूप' दाखवते.

गीक सकाळी उठतो, तेव्हा आपल्या डॉलचं हे रूप पाहून अवाक् होतो. 
'डॉल' सनी त्याच्यासाठी नाश्ता तयार करते आणि तोही अगदी मादकतेनं... या व्हिडिओतील सनीची सेक्सी अदा चाहत्यांना वेड लावणारीच आहे.

'सेक्सी गर्ल फ्रॉम चायना' हा व्हिडिओ यू-ट्युबवर जबरदस्त हिट झालाय. अवघ्या ४८ तासांत ६ लाखाहून अधिक नेटिझन्सनी सनीचा हा सेक्सी अवतार पाहिलाय. अनेकांनी सनीचा हा अवतार अश्लील असल्याचंही म्हटलंय.

व्हिडिओमध्ये काही ठिकाणी सनीला अधिकच उत्तान दाखवण्यात आलंय. अधिकाधिक 'हिट्स' मिळवण्यासाठीच निर्मात्यांनी हा प्रयत्न केल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. चीनची ही बाहुली गीकला नाश्त्यानंतर आंघोळही घालते. इतकंच नव्हे तर, ही डॉल सुपरवुमनसारखी आकाशातही झेपावते. गीकच्या जीममध्येही ही डॉल नानाविध कसरती करताना दिसते.

स्वीमिंग पूलमध्येही सनीनं हॉट सीन दिलेत. बॉलिवूडमधील कुठलीही नायिका सेक्स अपीलमध्ये आपल्यापेक्षा सरस नसल्याचंच तिनं दाखवून दिलंय.