ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतात सहिष्णुताच आहे - सनी लिओन

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - सध्या देशभरात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेत्री सनी लिऑनने यावर मत नोंदवताना भारतात कुठेही असहिष्णुता दिसली नसल्याचे म्हटले आहे.

असहिष्णुते बाबत माझे मत विचाराल तर भारत अत्यंत सहिष्णु असून हा देश मला आवडतो आणि भारतातल्या अनेक ठिकाणी फिरायलाही आवडते. येथे जर सुरक्षितता नसती, तर मी इथे राहू शकले असते का? असे सनी म्हणते. 

खानच्या असहिष्णुतेवरील वक्तव्यावर बोलताना सनी हसत म्हणाली कि माझे वक्तव्य तर अनेक वेळा फिरवले गेले आहे. काही दिवसांपूर्वी हॉलिवूडस्टार निकोल किडमनने भारतात अत्यंत सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले होते.

पॉर्न इंडस्ट्रीनंतर बॉलीवूडमध्ये प्रवेश करणारी सनी कॅनडा येथे राहत होती. गेल्या काही वर्षांपासून ती भारतात राहत आहे. बॉलीवूडमध्येही तिने आपले चांगले बस्तान बसवलेय.