ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

यापुढील चित्रपटांतून काजोल दिसणार

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) - आई झाल्यानंतर मुलांचे संगोपन नीट व्हावे यासाठी रुपेरी पडद्याला राम राम ठोकलेल्या काजोलने ‘दिलवाले’ चित्रपटातून यशस्वी पुनरागमन केले असून, काजोलने मुलगा आणि मुलगी पुरेसी मोठी झाल्यामुळे आता अधिक काम करायची इच्छा व्यक्त केली आहे.

पुढील काही दिवसात मी जास्त वेळा चित्रपटातून दिसेल अशी मी अपेक्षा करते. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटानंतर २०१० साली मी विश्रांती घेतली होती. कारण माझा मुलगा जन्मला होता आणि तो खूप लहान होता. 

आता माझा मुलगा ५ वर्षांचा झाला असल्याचे काजोलने सांगितले. मी २०१६ च्या मध्यावर नवीन चित्रपटाचे काम सुरू करणार आहे. पण शाहरुखसारखे वर्षाला तीन चित्रपट करणे मला शक्य नाही. मी त्याच्या इतकी मेहनत करु शकत नसल्याचे काजोल म्हणाली.