ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

आमीरबरोबर काम करायला मिळाले तर... : सनी लिओनी

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) - सुपरस्टार आमीर खानबरोबर काम करायला मिळाल्यास मी जगातील सर्वात आनंदी तरुणी असेन, अशी भावना अभिनेत्री सनी लिओनीने व्यक्त केली आहे. मस्तीजादे या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सनी बोलत होती. 

आमीरसारख्या उत्कृष्ट अभिनेत्याबरोबर काम करणे हे कोणत्याही नवोदित कलाकाराचे स्वप्न असते. आमीरसोबत काही क्षणांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यास मी सर्वात आनंदी तरुणी असेन, अशी प्रतिक्रिया तिने दिली. 

आमीर खान कदाचित माझ्या पार्श्वभूमीमुळे माझ्याबरोबर काम करत नसल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनीने म्हटले होते. दरम्यान, ही मुलाखत जेव्हा आमीरच्या पाहण्यात आली तेव्हा त्याने ट्विट करून सनी लिओनीला मला तुझ्याबरोबर काम करायला आवडेल, असे सांगितले होते.