ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

‘दिल दोस्ती दुनियादारी’; आफ्टर द ब्रेक

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) - तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ही मालिका काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर लवकरच पुन्हा एकदा मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मालिकेतील कलाकारांनी गुरुवारी डोंबिवलीत झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली. 

मालिकेतील ‘कैवल्य’, आशू’, ‘सुजय’, ‘अ‍ॅना’, ‘रेश्मा’, ‘मीनल’ या सर्व पात्रांनी प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थीनींच्या मनात घर केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या मालिकेची विशेष हवा आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच काही काळासाठी ही मालिका बंद केली जाणार आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मालिकेतील ‘कैवल्य’सह सर्व कलाकारांनी ही मालिका लवकरच बंद होणार असल्याची घोषणा व्यासपीठावरुन केली. 

मालिका बंद होणार असल्याची घोषणा होताच उपस्थित तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्षणभर शांतता पसरली. पण त्यानंतर लगचेच ‘हा अल्पविराम आहे, आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत, असे जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट आणि शिटय़ांच्या आवाजात याचे उपस्थितांकडून स्वागत झाले.