ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

‘क्या कूल…’ला कोणी परवानगी दिली – न्यायाधिश संतप्त

>> १५ वर्षाच्या मुलीने केला न्यायालयात दावा दाखल

नवी दिल्ली, दि. २९ (प्रतिनिधी) - नुकताच बॉक्स ऑफिसवर तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि मंदाना करिमी अभिनित ‘क्या कूल है हम-३’ च्या अॅडल्ट कन्टेंटची सर्वत्र चर्चा असून आता या चित्रपटासंदर्भात नवीन वाद समोर आला आहे.

दरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या कन्टेंटसंदर्भात सेन्सॉर बोर्डाला फटकारले असून याबाबत न्यायालयाने म्हटले आहे, सेन्सॉर बोर्डाचे सदस्य जेव्हा स्वतः असे चित्रपट कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही. तर तो प्रदर्शित कसा करण्यात आला. एका १५ वर्षीय तरूणीने या अॅडल्ट चित्रपटासंदर्भात लुधियानातील उच्च न्यायालयात अपील केली आहे. २२ जानेवारी रोजी झालेल्या या चित्रपटाविरोधात १० वीमध्ये शिकणाऱ्या जान्हवी बहल या विद्यार्थीनीने एनजीओच्या मदतीने ही याचिका दाखल केली आहे.

उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली त्यात सेन्सॉर बोर्डाला फटकारण्यात आले. सेन्सॉर बोर्डातील सदस्य आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहू शकत नाही, मग अशा चित्रपटाला कोणी मंजुरी दिली. न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना सेन्सॉर बोर्डाने सांगितले की, या चित्रपटातील एकूण १०७ सीन कट करण्यात आल्यानंतर केवळ ३२ सीन आणखी कट करण्यात आले. त्यानंतर या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देण्यात आले.