ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रियंका चोप्रा ऑस्कर सोहळ्यात पुरस्कार प्रदान करणार

नवी दिल्ली, दि. २ (प्रतिनिधी) - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा ८८  वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करताना दिसणार आहे. ऑस्कर अॅकडमीने ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंकासह पुरस्कार प्रदान करणाऱ्या १३ मान्यवरांची यादी प्रसिद्ध केली आहे. २९ फेब्रुवारीला डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा होईल.

प्रियंकाने ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे. ती लिहिते, “Looking forward @ The Academy!! This will be an insaaaane night!”
जगभरातील चित्रपट रसिकांमध्ये ऑस्कर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. चित्रपट कलाकार, रसिक, समीक्षकांचे ऑस्कर पुरस्कार सोहळयाकडे लक्ष असते. अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’तील भूमिकेमधून प्रियंकाने हॉलिवूडवर आधीच आपली छाप उमटवली आहे. प्रियंकाला या भूमिकेसाठी २०१६ मध्ये ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ मिळाला होता. सध्या ती क्वान्टिकोच्या दुस-या सीझनसाठी शूट करत आहे.

प्रियंका चोप्राला नुकताच भारत सरकारतर्फे पद्मश्री जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील तिची काशीबाईची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसह समीक्षकांचीही वाहवा मिळवून गेली होती. सहाय्यक भूमिकेसाठी तिचा फिल्मफेअरनेही गौरव करण्यात आला.

लवकरची प्रकाश झा यांच्या जय गंगाजल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी  ‘इट्स माय सिटी’ ही फक्त मोबाईल प्रेक्षकांसाठी तिची सीटकॉम मालिकाही सुरु झाली.