ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

खंडेराया फेम देवदत्तच्या ताफ्यात १४ लाखांची लाल बाइक!

>> देवदत्तच्या सर्वच गाड्या लाल रंगाच्या

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) - झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेतील भूमिकेमुळे तसा तर तो सतत चर्चेत असतोच. पण यावेळी त्याचे चर्चेत येण्याचे कारण जरा हटके आहे. त्याने नव्या वर्षाची सुरूवात त्याचे स्वप्न पूर्ण करून केले आहे.

देवदत्तने वाढदिवसानिमित्त स्वत:साठी गिफ्ट घेतले आहे. आणि हे गिफ्ट काही साधेसुधे नाही. देवदत्तने तब्बल १४ लाखांची एक परदेशी बाईक विकत घेतली आहे. ट्रिम्फ स्पीड ट्रिपल असे या बाईकचे नाव असून ही बाईक खास लाकडापासून तयार करण्यात आली आहे. ही बाईक त्याने लंडनहून मागवली आहे. लाल रंगाची ही बाईक त्याच्या दमदार पर्सनॅलिटीलाही उठून दिसते.

देवदत्तने ही लाल रंगाची बाईक का घेतली त्यालाही एक वेगळे कारण आहे. या बाईक व्यतिरीक्त देवदत्तकडे आणखी काही लाल रंगांच्या गाड्या आहेत. ज्यात सायकल, बुलेट, दोन कार, त्याच्या पत्नीची कार यांचा समावेश आहे. आता त्याच्या लाल ब्रिगेडमध्ये या नव्या बाईकची भर पडली आहे. देवदत्त याला बाईक-कारमधून फिरण्याची चांगलीच आवड आहे. देवदत्तला लाल रंगांची चांगलीच आवड आहे. या लाल रंगाबाबत देवदत्तने सांगितले की, त्याचे आणि लाल रंगांचे स्पेशल कनेक्शन असून संघर्षाच्या काळात जेव्हा तो कोकणातून मुंबईत ऑडिशनसाठी यायचा तेव्हा, तो लाल एसटीमधून यायचा. त्यामुळे त्याचे लाल रंगाशी एक जवळचे नाते तयार झाले आहे.