ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अभिनेते प्रकाश राज यांना ५०व्या वर्षी पुत्ररत्न

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) - ‘सिंघम’, ‘वॉण्टेड’ या बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता प्रकाश राज यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. प्रकाश राज यांची दुसरी पत्नी पोनी वर्मा हिने बुधवारी मुलाला जन्म दिला.

प्रकाश यांनी म्हटले आहे की, ही एक खूप छान भावना आहे. आम्ही दोघेही फार खूश आहोत. आमचं हे बाळ आमच्या आयुष्यात खूप आनंद आणि चैतन्य घेऊन येणार आहे.

तिनदा राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारे प्रकाश राज यांनी २०१० साली पोनी हिच्याशी विवाह केला होता. त्याआधी त्यांनी ललिथा कुमारी हिच्याशी विवाह केला होता. मात्र, त्यांचे नाते अधिक काळ टिकू शकले नाही अखेर, त्यांनी २००९ साली घटस्फोट घेतला. ललिथापासून त्यांना मेघना आणि पूजा या दोन मुली आहेत.