ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रामायणातील कैकयीची दासी मंथरा मूळची सुंदर स्त्री

पणा सर्वांना माहितच असेल की, कैकयीची दासी मंथरा हिने कैकयीचे कान भरल्यामुळे राम, सिता व लक्ष्मण यांना १४ वर्षे वनवास भोगावा लागला. मंथरा ही कुबडी व कुरूप होती असे पुराणात सांगितले गेले आहे. प्रत्यक्षात मंथरा ही मूळची अतिशय सुंदर स्त्री होती.

परंतु एकदा मंथराने असे काहीतरी द्रव्य प्राशन केले की, त्यामुळे तिची कंबर जख्ख म्हाताऱ्या बाईसारखी वाकली गेली आणि तिचे सौंदर्यही लुप्त झाले व ती एक कुरूप स्त्री बनली.

पुराणात म्हटल्याप्रमाणे कैकयीचे वडील राजा अश्वपतीला वृहदश्व नावाचा भाऊ होता. त्याची मुलगी रेखा खूपच सुंदर आणि मोठ्या मोहक डोळ्यांची होती. कैकयी आणि रेखा या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यांना एकमेकाशिवाय जराही करमत नसे.

रेखा जशी सुंदर होती तशीच अतिशय बुद्धीमान होती. परंतु एक दिवस तिला विचित्र आजार झाला. या आजारामुळे तिला भयंकर तहान लागायची. तसेच भरपूर घामही फुटायचा. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून तिचे वडील वृहदश्व अतिशय अस्वस्थ व्हायचे.

एक दिवस रेखाला भयंकर तहान लागली. तहानेने ती व्याकूळ झाली होती. तेव्हा तिने तुळस, चंदन आणि मिश्रीच्या मिश्रणाने बनवलेले सरबत प्यायले. या सरबतामुळे रेखामध्ये त्रिदोष निर्माण झाले आणि तिच्या अवयवांनी काम करणे बंद केले.

सगळ्यांना वाटले की रेखा आता काही जगत नाही. ती थोड्या दिवसांची पाहुणी आहे. लवकरच तिचा मृत्यू होणार असेच सगळ्यांना वाटत होते. परंतु वेळीच तिच्यावर उपचार झाल्याने तिचा मृत्यू टळला. परंतु तिचे सौंदर्य बिघडले. तिचे अवयव पुन्हा काम करायला लागले. परंतु ती पाठीत कायमची वाकडी झाली. तिचे खांदे आणि गळाही खाली झुकले गेले.

या आजारामुळे तिचे नाव कुबडी मंथरा असे पडले गेले. आपल्या कुरुपावस्थामुळे ती आयुष्यभर कुमारी राहिली. जेव्हा मंथराची मैत्रीण कैकयी हिचे लग्न झाले तेव्हा तिने आपल्या वडिलांकडे मंथराला सासरी बरोबर नेण्याची विनंती केली. वडिलांनी परवानगी दिल्यानंतर कैकयीबरोबर मंथरा अयोध्याला आली आणि पुढील रामायण घडले.