ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

या शिवलिंगातून जातो पाताळात जाण्याचा मार्ग

छत्तीसगढ, दि. १९ (प्रतिनिधी) - छत्तीसगड राज्याची काशी अशी ओळख झालेल्या खरौद नगर येथे दुर्लभ शिवलिंग असलेले शिवमंदिर आहे. लक्ष्मणेश्वर मंदिर असे नांव असलेल्या या मंदिरातील शिवलिंगावर १ लाख छिद्रे आहेत व यातील एक छिद्र म्हणजे पाताळाचा रस्ता आहे असे मानले जाते. 

लंका विजयानंतर लक्ष्मणाने पापक्षालनासाठी रामाला शिवलिंग स्थापन करण्याची विनंती केली तेव्हा रामाने या महादेवाची स्थापना केली असे सांगितले जाते. रामायणकालीन या मंदिराचा जीर्णोद्धार रतनपूरचा राजा खड्गदेव याने केला. हे मंदिर सहाव्या शतकातले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.

या छिद्रमय लिंगातील एका छिद्रात कितीती पाणी ओतले तरी ते छिद्र भरत नाही. हे पाणी थेट पाताळात जाते असे समजले जाते व त्यामुळे तो पाताळाचा मार्ग असल्याची भावना आहे. या मंदिरामागची कथा अशी सांगतात, की रावणाचा वध केल्यानंतर रामाला ब्रह्महत्येचे पातक लागले कारण रावण ब्राह्मण होता तर राम क्षत्रिय. त्या पापक्षालनासाठी रामेश्वरावर अभिषेक केला गेला तेव्हा अभिषेकासाठी लक्ष्मण सर्व पवित्र प्रमुख तीर्थे आणण्यासाठी गेला तेव्हा त्याने या गुप्त तीर्थ शिवरीनारायण येथील पाणीही आणले. मात्र येथून पाणी नेऊन अयोध्येकडे येताना लक्ष्मण खूप आजारी पडला. त्यातून मुक्त होण्यासाठी लक्ष्मणाने महादेव पूजा केली व रामाला येथे महादेवाची स्थापना करण्याची विनंती केली.

रामाने येथेच खर व दूषण या दोन राक्षसांचा वध केल्याचेही सांगितले जाते. त्यावरूनच या जागेचे नांव खरौद असे पडले आहे. या मंदिराच्या बाहेरच जीर्णोद्धार केलेला राजा खड्गदेव त्याची राणी हात जोडून प्रदक्षिणा मार्गावर उभे असल्याच्या मूर्ती आहेत. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो व महादेवाची वरात काढली जाते.