ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

माझ्या गर्भाशयात आफ्रिदीचे मूल वाढत आहे - अर्शी खान

भोपाळ, दि. १५ (प्रतिनिधी) - पाकिस्तानी टी-20 टीमचा कप्तान शाहिद आफ्रिदी आणि भारतीय मॉडेल अर्शी खान यांच्यातील प्रेमसंबंधांवर मीडियामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आर्शी खान हिने त्याला दुजोरा दिला. एवढेच नाही तर आपल्या पोटात आफ्रिदीचे मूल वाढत असल्याची कबुलीही दिली.

एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत आर्शीने आफ्रिदीबरोबर असलेल्या संबंधाची कबुली दिली. तिने म्हटले आहे की, होय, मी आफ्रिदीच्या मुलाची आई बनणार आहे आणि भोपाळमध्येच हे मूल जन्म घेईल. यापूर्वी तिने अनेक वेळा आफ्रिदीबरोबर असलेले  संबंध धुडकावून लावले होते. 

यापूर्वी आर्शीने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती म्हणताना दिसत आहे की, माय बेबी, माय जान, मैं बहुत जल्दी आ रही हूं पाकिस्तान। तुम्हारे लिए, तुमसे मिलने। उसके साथ मैं अपना काम भी करने वाली हूं। अर्शी बदनाम हुई आफरीदी तेरे लिए। इंडिया बोलता है पाकिस्तान जाओ, पाकिस्तान बोलता है इधर आओ। अब मुझे अपनाएगा कौन...तुम।

अर्शी खान ही मूळची अफगाणिस्तानची राहणारी आहे. अर्शी खान जेव्हा ४ वर्षांची होती तेव्हा तिचे कुटुंब अफगाणिस्तानहून भोपाळला आले. आर्शिदाने आपले शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण भोपाळमध्येच पूर्ण केले आहे. यापूर्वी जेव्हा अर्शी खान आणि आफ्रिदीच्या प्रेमसंबंधाची बातमी उघड झाली तेव्हा असे सांगण्यात आले की, दोघेही एकत्र काही दिवस दुबईला राहिले होते.