ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

'रंगा पतंगा'चं म्युझिक लाँच

'ऐ सनम आँखो को मेरी खुबसुरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे' या गीताची गझल आणि कव्वाली अशा दोन प्रकारांत वाजलेली धून...   संगीतकार कौशल इनामदार यांनी  सांगितलेली गाण्यांच्या निर्मितीची गमतीदार कथा... उपस्थितांकडून मिळालेली  दाद...

निमित्त होतं फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट निर्मित, बिपीन शहा मोशन पिक्चर्स प्रस्तुत रंगा पतंगा या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचे. डॉ. जवाहर मुथा यांच्या हस्ते म्युझिक लाँच करण्यात आले. चित्रपटाचे पटकथा-संवादलेखक व दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, निर्माता-सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे, अभिनेता मकरंद अनासपूरे, संदीप पाठक, भारत गणेशपूरे, संगीतकार कौशल इनामदार, गायक आदर्श शिंदे, प्रस्तुतकर्ता बिपीन शहा, संकलक सागर वंजारी, अभिनेत्री गौरी कोंगे, हार्दिक जोशी, उमेश जगताप, तेजपाल वाघ, कथालेखक चिन्मय पाटणकर आदी या वेळी उपस्थित होते. चित्रपटाचा ट्रेलरही या वेळी दाखवण्यात आला. १ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

'आतापर्यंतच्या संगीत कारकिर्दीत रंगा पतंगा हा माझ्यासाठी खूर आव्हानात्मक चित्रपट आहे. ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांची रचना गझल आणि कव्वाली या दोन प्रकारात संगीतबद्ध करायची होती. एक चाल केल्यावर ती मनातून काढून पुन्हा नवीन चाल करणं खूप अवघड होतं. जवळपास चार महिने या गाण्यांवर काम करत होतो. एकच गाणं दोन वेगळ्या संगीत प्रकारांमध्ये वापरण्याचा वेगळा प्रयोग या निमित्ताने झाला आहे,' असं कौशल इनामदार यांनी सांगितलं.

'सध्या चित्रपटांत उडत्या चालीची गाणी गात असताना प्रथमच गझल गाण्याची संधी रंगा पतंगा या चित्रपटामुळे मिळाली.  पार्श्वगायक होण्यापूर्वी मी गझलच गायचो. मात्र, गेल्या काही वर्षांत गझल गाण्याची संधीच मिळाली नाही. कौशल इनामदार यांनी मी गझल गातो, लक्षात ठेवून मला या चित्रपटात गाणं दिलं याचा आनंद वाटतो. पंधरा दिवस त़यारी करून आम्ही गझलचं रेकॉर्डिंग केलं. एकच गाणं दोन प्रकारांत गायला मिळणं हा गायक म्हणून पहिला अनुभव आहे,' असं आदर्शनं सांगितलं. सर्वांच्या आग्रहाखातर  त्यानं चित्रपटातील गझल सादर केली. त्याला सर्वांकडून भरभरून दाद  मिळाली. 

'कोणताही चित्रपट करताना केवळ सिनेमॅटोग्राफर म्हणून माझा त्यात सहभाग नसतो. त्या चित्रपटासाठी भावनिक आणि मानसिक गुंतवणूक करतो. आजपर्यंत उत्तम आशयविषय असलेल्या चित्रपटांसाठी काम केलं. मात्र, स्वतंत्रपणे काहीतरी करावं हा विचार मनात होता. त्यासाठी स्वतःच निर्मिती करणं हा पर्याय होता. मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करत असताना उत्तम विषय प्रेक्षकांपुढे आणणंही आवश्यक आहे. थोडा व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून आशयघन चित्रपट करण्यासाठी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 'रंगा पतंगा' करताना मकरंद अनासपूरे, संदीप पाठक, कौशल इनामदार यांच्यासारखे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांची निवड केली, असं निर्माता अमोल गोळे म्हणाला. 

सध्याच्या परिस्थितीचं नेमक्या पद्धतीनं चित्रण 'रंगा पतंगा'नं केलं आहे. मार्मिक विनोदातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत वास्तव दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच भावेल, असा विश्वास बिपीन शहा यांनी व्यक्त केला.