ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

व्यावसायिक, मनोरंजनाच्या दृष्टीतूनच चित्रपटनिर्मिती नागराज मंजुळे

>> ‘चित्रपटांतून सामाजिक परिवर्तन’ विषयावरील व्याख्यान

पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) - “काहीअंशी चित्रपट सामाजिक परिस्थितीवर आधारलेले असले, तरी व्यावसायिक आणि मनोरंजन या दृष्टिकोनातूनच त्याची निर्मिती केली जाते. त्यामुळे सर्वच चित्रपटांकडून सामाजिक परिवर्तनाची आशा ठेवणे अयोग्य ठरेल,” असे मत प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक व पटकथा लेखक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित ‘चित्रपटांतून सामाजिक परिवर्तन’ या विषयावर नागराज मंजुळे बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा, अध्यासनाचे सचिव प्रा. विनोद जाधव, माईर्स एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागराज मंजुळे म्हणाले, “काळ बदलला, तंत्रज्ञान विकसित झाले. मात्र, चित्रपटांतील स्त्री अजूनही बदलली नाही, ही शोकांतिका आहे. पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला मागासलेल्या जमातींप्रमाणेच उपेक्षित ठेवलेले आहे. कोणतीही कलाकृती मांडताना त्याकडे व्यावसायिकतेतून पाहिले जाते. त्यामुळे सामाजिक परिवर्तनापेक्षा भेदभाव सुरु होतो. चित्रपटांतून दाखवलेले आभासी प्रेम आणि वास्तवातील प्रेम यामध्ये मोठी तफावत आहे. माणूस म्हणून जगण्याचा मार्ग चित्रपटांनी दाखवायला हवा. प्रत्येकाच्या मनातून जात काढण्याची आज गरज आहे.”

“महापुरुषांना जातींमध्ये विभागणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या हवाल्याने आरक्षण मागितले जाते. मात्र, आरक्षण ही खैरात ती संधी आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. महापुरुषांच्या जयंतीदिवशी नशा करुन धिंगाणा घालण्यापेक्षा आणि नाचण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. चित्रपटांतून त्यांचे विचार पेरण्याचा प्रयत्न झाला, तर समाजात परिवर्तनाची भावना रुजू शकेल” असेही नागराज मंजुळे यांनी नमूद केले.

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “चित्रपटांतून राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले जाते. त्यामुळे सबंधित घटकांवर त्याचा परिणाम होत असतो. समाजातील विसंगती मांडण्याची कला चित्रपटांतून साध्य होते. फक्त त्या विसंगती मांडताना कोणाही बद्दल द्वेष असता कामा नये. तसेच चित्रपट बनविताना प्रामाणिकपणे मेहनत घेतली आणि तो विषय मांडला तर समाजावार त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चित्रपटांमुळे समाजातील विविध प्रश्‍नांबाबत जनजागृती होते.”

प्रा. रतनलाल सोनग्रा यांनीही आपले मत मांडले. प्रा. विनोद जाधव यांनी प्रास्ताविक केले. दीपक मस्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.