ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आयटीआय प्रशिक्षण कौशल्य विकासाची सुवर्णसंधी

(विशेष लेख)
सध्या भारत सरकारने कौशल्य विकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून देश-विदेशात आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या अनेक नवनवीन संधी निर्माण होत आहेत. कौशल्य विकासातील एक भाग म्हणजे आयटीआय प्रशिक्षण आहे. यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेतच, याशिवाय अनेक खाजगी आयटीआय देखील कार्यरत आहेत.
सांगली येथे पद्मभूषण वसंतदादा औद्योगिक वसाहत, आरटीओ ऑफीस जवळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कार्यरत असून येथे इलेक्ट्रिशिअन, फीटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, ग्राईंडर, वायरमन, ड्राफ्टस्मन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल असे विविध 24 प्रकारचे अभ्यासक्रम असून कालावधी 1 वर्ष, 2 वर्ष इतका आहे. संस्थेचा 28 एकर इतका भव्य परिसर असून सर्व अभ्यासक्रमांना योग्य प्रमाणात नवनवीन अशी मशिनरी, टूल्स उपलब्ध आहेत. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शासकीय, खाजगी कंपनीमध्ये हजारो विद्यार्थ्यांना ऍप्रेंटीस मिळाली आहे. अनेकजण टाटा मोटर्स, थायसेन ग्रुप इंडस्ट्रीज, कमिन्स, बजाज ऑटो, थरमॅक्स अशा नामांकित कंपन्यांमध्ये कायम झाले आहेत. तर अनेकजणांनी स्वत:चा उद्योग उभा करून नावलौकीक मिळविला आहे.
सध्या राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांची प्रवेश फेरी प्रक्रिया चालू झाली असून अद्यापही ज्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी शासनाने 1 ते 13 ऑगस्ट दरम्यान प्रवेश अर्ज भरण्याची संधी दिलेली आहे. या काळातच उमेदवारांनी नवीन ऑनलाईन अर्ज करून आयटीआयमध्ये अर्ज निश्चिती करणे आवश्यक आहे. दिनांक 16 ऑगस्ट रोजी सर्व मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून गुणवत्तेनुसार शिल्लक जागावर प्रवेश घेता येईल. संस्थेमध्ये मार्गदर्शन कक्षास भेट देऊन अधिक माहिती घेता येईल. समुपदेशन फेरी 16 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8 वाजता सुरू होत असून इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
- यतिन प्र. पारगांवकर, 
प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली
(सौजन्य- महान्यूज)