ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

आंबेठाणच्या स्वागत कमानीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

चाकण, दि. ५ (चंद्रकांत मांडेकर) - राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगातही ऐवढी मोठी स्वागत कमान मी आजपर्यंत कुठेही पाहिली नाही असे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी शिव छत्रपती स्वागत कमानीच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

मॉडेल व्हीलेजकडे  वेगाने वाटचाल करणाऱ्या आंबेठाण ( ता.खेड ) येथील शिव छत्रपती स्वागत कमान व गावातील सर्व सामान्य नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे याकरिता नव्याने बसविण्यात आलेल्या  एटीम पध्दतीने पाणी देणाऱ्या  आरओ प्लाँन्टचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे संघटनमंत्री रवि अनासपुरे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देवकर, खेडचे प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे, तहसिलदार सुनिल जोशी, नायब तहसिलदार माणिक राजेनिंबाळकर, भाजपाचे नेते शरद बुट्टे पाटील, लक्ष्मण टोपे, नियोजन समितीचे सदस्य अतुल देशमुख, मेदनकरवाडीच्या सरपंच प्रियांका मेदनकर, भाजपा नेते राजन परदेशी, कालिदास वाडेकर, राजगुरुनगर नगरचे नगरसेवक शिवाजी मांदळे, उद्योजक राजेंद्र गायकवाड, भाजपाचे खेड तालुका अध्यक्ष दिलीप वाळके, विश्वास बुट्टे पाटील, उपसरपंच संदीप आंद्रे, बाबा पडवळ, माणिक कदम, शंकर खेंगले, काळूराम पिंजण, चांगदेव शिवेकर, आंबेठाण गावचे सरपंच दत्तात्रेय मांडेकर, उपसरपंच सविता नाईनवरे, सदस्य अशोक मांडेकर, सुभाष मांडेकर, गणेश मांडेकर, काळूराम मांडेकर, गिताबाई मांडेकर, सुधा दवणे, मनिषा गायकवाड, राधाबाई भालेराव, लता मांडेकर, कल्पना मांडेकर, मंदा मांडेकर यांसह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

बापट पुढे म्हणाले की, आंबेठाण गावातील विकास कामांकडे पाहिले की  अभिमान वाटतो, खुप सुंदर काम या गावातील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटीने केलीत. मी आजपर्यंत जगातील अनेक देशात फिरलो परंतू अशी स्वागत कमान कुठेही मला दिसली  नाही.आंबेठाण गावच्या विकासाची कामे खूप झाली आहेत. गावातील ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे याकरिता गावातील पुरातन गाव तळ्यातील गाळ काढून चौफेर सिमेंटच्या भिंती बांधून यातील पाणी या  नव्याने उभारण्यात आलेल्या  आरओ प्लॉन्टसाठी वापर करण्यात येत आहे  हा प्लॉन्ट असुध्द पाणी शुद्धकरून गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही सोडवला आहे. 

आंबेठाणचे सरपंच दत्तात्रेय मांडेकर यांनी सांगितले की , गावातील ग्रामस्थांनी पंचवीस लाख रूपये खर्च करून ही स्वागत कमान उभारली असल्याचे आहे. या शिव छत्रपती स्वागत कमानीच्या कामाकरिता माजी  सरपंच अशोक मांडेकर यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की,  आंबेठाण गावचे वैभव या स्वागत कमानीवरूनच येथून येणार्या जाणार्यांच्या लक्षात येणार आहे. गावच्या चारही बाजूने औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गावातील लोकांना चांगल्या व उच्चप्रतिच्या सुविधा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत नेहमी करणार आहे.बदलत्या काळाबरोबर गावाने जुना पारंपारिक बाज सोडून नव्याचे रूप स्विकारले आहे. जुनी घरी जाऊन त्या जागेवर उंची इमारती उभ्या राहिल्या आहेत. या शिव छत्रपती प्रवेश द्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. याशिवाय मावळे, हत्ती व तोफा बसविण्यात आल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे गावामध्ये महिंद्रा सिआयई कंपनीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील पहिले बालोद्यान उभारण्यात आले आहे. तसेच एक कोटी रूपये खर्च करून गावाच्या ग्रामदेवतांचे दक्षिण मुखी हनुमान व भैरवनाथ मंदीराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून ते लवकरच पुर्णत्वाकडे नेण्यात येईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मांडेकर यांनी केले तर आभार काळूराम मांडेकर यांनी मानले.