ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मानवाधिकारा मधील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी - उज्ज्वल निकम

चाकण, दि. ५ (चंद्रकांत मांडेकर) -  विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या, व पिडीत आदि महिलांसाठी विशेष योगदान देणाऱ्या मानवाधिकार संघटने मधील महिलांचे समाजासाठी सुरु असलेले काम खरोखरच भूषणावह व प्रेरणादायी असल्याचे ' गौरौउदगार विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी येथे काढले.

विनर्स हेल्थ क्लब व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या वतीने येथील बालाजीनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सदिछा  भेटीत मार्गदर्शन करताना निकम बोलत होते. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश सचिव सुनील उबाळे, जनसंपर्क अधिकारी नलिनी शिंदे,  महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा संगीता नाईकरे, जिल्हा सचिव वैशाली पानसरे, तालुका अध्यक्षा रिबेका शिंदे, उष्कालच्या अध्यक्षा सुनिता पवळे,  संजय वाघमारे, संतोष कुसाळकर, संजय अडागळे, प्रदीप शिंदे, लक्ष्मण लोखंडे, स्वप्नील पाटील आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ मानवाधिकारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

समाजातील पिडीत महिलांना न्याय देण्यासाठी मानवाधिकारच्या महिलांनी घेतलेला पुढाकार निश्चितच संबधित महिलेच्या सुखी संसाराची नांदी आहे, या बद्दल समाधान व्यक्त करून, निकम म्हणाले, ' निस्वार्थी भावनेने ग्रामीण भागात महिलांचा सुरु असलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असून, असेच उपक्रम महिलांनी अखंडपणे चालू ठेवणे हि काळाची गरज आहे. महिलामुळेच मानवाधिकाराची ताकद समाजाला कळणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही.' आमदार महेश लांडगे, सुनील उबाळे, व रिबेका शिंदे आदिनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

विनर्स हेल्थ क्लबमधील व्यायामाच्या संपूर्ण  साहित्याची पाहणी करून निकम यांनी यावेळी खेळाडू व युवकांकडून खेळाविषयी माहिती जाणून घेतली. सुनील उबाळे, रिबेका शिंदे आदींच्या हस्ते उज्ज्वल निकम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वैशाली पानसरे, नलिनी शिंदे आदींनी स्वागत केले. 

प्रदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. रिबेका शिंदे यांनी सुत्रसंचलन, तर संगीता नाईकरे यांनी आभार मानले.