ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विकासाचे राजकारण करत असल्याने निधीची कमतरता नाही - शरद बुट्टे पाटील

चाकण, दि.५ (चंद्रकांत मांडेकर ) - आज पर्यंत  विकासाच्या मुद्दयावरचे   राजकारण करत असल्यानेच  भामनेर  खोऱ्यातील गावांमध्ये विकासासाठी सर्वाधिक निधी मिळत  आहे, मी आजही विकासकामाला लागणार्या निधी करता जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्याकडे सतत  पाठपुरावा करत असल्याने मोठा निधी  रस्ते विकासासाठी  मिळत असल्याची माहिती भाजपा नेते व जि.प.चे मा.सभापती शरद बुट्टे पाटील यांनी येथे सांगितले.

पालकमंत्री ना.गिरीश बापट यांच्या  जिल्हा नियोजन समितीतून  मंजुर करण्यात आलेल्या निधीतून  रोहकल -पिंपरी खु. ( ता.खेड) रस्ताच्या  ड़ांबरीकरणाचे  उद्घाटन भाजपाचे नेते शरद बुट्टे पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले,  त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जि.प.सदस्या व जिल्हा नियोजन समिती सदस्या सुरेखा ठाकर,शिरूर पं.स.चे सदस्य भगवान शेळके,आंबेठाणचे सरपंच दत्तात्रय मांड़ेकर,रोहकलच्या सरपंच निता गायकवाड,पिंपरी-गोनवड़ीच्या सरपंच भामाबाई भांगरे,उपसरपंच मिराताई काळे,माजी.सरपंच गोरक्षनाथ काळे,पिंपरी बु.चे सरपंच कैलास ठाकूर, ग्रा.पं.सदस्य सचिन काळे,उद्योजक तानाजी काळे यांच्यासह  ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बुट्टेपाटील म्हणाले , विकासाचा दृष्टिकोन न ठेवता केवळ लग्न व दशक्रिया करून समाज पुढे जाणार नाही,लोकांनी व पक्षाने दिलेली संधी जनकल्याणासाठी न वापरता स्वतःच्या मोठेपणासाठी वापरणारे पुढारी समाजाच्या प्रगतीमधील मोठा  अडसर ठरत  आहेत.सवंग लोकप्रियतेसाठी चाललेली स्पर्धा भविष्यासाठी धोकादायक आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी रोहकल ते पिंपरी खु. रस्त्याचे तसेच ग्रामपंचायतीने सार्वजनिक फलबागेसाठी केलेल्या  जमिन सपाटीकरण कामाचे उदघाटन यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी जुन्या गावठाणाचे जागेवर फळबाग तयार करत आहेत.भविष्यात या ठिकाणी कृषीपर्यटन केंद्र करण्याचा गावांचा विचार आहे.

गोरक्षनाथ काळे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन काळे यांनी आभार मानले.