ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

किरकोळ कारणावरून वेटरने केला सहकाऱ्याचा खुन

पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) - किरकोळ कारणावरून वेटरनेच आपल्या सहकारी वेटरचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शिरूर तालुक्यातील निमोणे-गुनाट रस्त्यावरील शिवनेरी ढाब्याबर घडली.

अनिल सुखदेव पाटुळे (वय-३०, रा. जालना) असे खुन झालेल्या वेटरचे नाव आहे. फकिरा साबळे (वय-३०, रा. बुलढाणा) हा वेटर गंभीर जखमी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सुखदेव पाटुळे (वय ३० वर्षे रा.मुळगाव मंडपगाव, ता.जि. जालना ) आणि दिगंबर फकीरा साबळे (वय ३० वर्षे रा.मुळगाव हिवरा, ता. सिंदखेदराजा, जि. बुलढाणा) हे बुधवारी रात्री जेवण करुन ढाब्याच्या पाठीमागील बाजुस झोपले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तिनी या दोघांवर लाकडी दांडक्याने या दोघांच्या डोक्यावर हल्ला केला. यात पाटुळे हे जाग्यावरच ठार झाले, तर साबळे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. यानंतर साबळेंना पहाटे शुद्ध आल्यावर आपले साडू पाटुळे मयत झाल्याचे समजले. 

दरम्यान याच ढब्यावरील छोटू नावाचा वेटर बेपत्ता झाल्याची बाबही उघडकीस आली. छोटूनेच पाटुळे यांचा खून केल्याचा संशय बळावल्याने त्याच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर करीत आहेत.