ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान
वडगाव काशिंबेग,  दि. १२ (ज्ञानेश्वर खिरड) - पुणे आणि परिसरात काल झालेल्या पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. काल दुपारी झालेल्या पावसाने आंबेगाव तालुक्याला झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यातील कांदा पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

काल अचानक आलेल्याय अवकाळी पावसाने आंबेगाव तालुक्यतील कांदा उत्पादक शेकऱ्यांची कांदा झाकनीसाठी चांगलीच धावपळ झाली. अवकाळी पावसाने शेतातील काढणीला आलेली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानामध्ये चरायला नेलेल्या मेंढपाळांची देखील या पावसामुळे धावपळ झाली. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

तळेघर आहुपे याठिकाणी पाण्याची भिषण परिस्थिती आहे. या पावसामुळे शेतीला पाणि मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पाऊण तास झालेल्या अवकाळी पावसामुळे ओढे नाले थोड्या फार प्रमाणात वाहू लागले आहेत. आणि शेतांमध्ये पाणी साचले आहे. शेतकऱ्याला शेतीला लागणाऱ्या पाण्याची चिंता थोड्या दिवसासाठी मिटली आहे. ह्या अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान तर काही शेतकऱ्यांना समाधान झाले आहे.