ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रोहकल येथे पिठाच्या गिरण्यांचे वाटप

चाकण, दि. १२ (चंद्रकांत मांडेकर) - पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागाकड़ून येथिल ४६ विद्यार्थी विविध विद्यार्थींनींना सायकली आणि १२ महिला व अपंगांना पिठगिरणीचे वाटप तसेच  दलितवस्ती समाजमंदिरासाठी शाहु-फुले व आंबेडकर यांचे जीवनावरील महत्वाचे ग्रंथाचे वाटप जिल्हा परिषदेचे माजी सभापती व भाजपाचे नेते बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा ठाकर,रोह्कलच्या सरपंच निता गायकवाड, उपसरपंच दिलीप काचोळे,माजी उपसरपंच नितीन ठोंबरे,प्रमोद आमले, प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक दिनेश ठाकुर,ग्रामसेवक शंकर ढोरे,विनोद नितनवरे,अमृत ठोंबरे,बाळासाहेब ठोबंरे,रामदास ठोबरे,छभन गायकवाड,किसन ठोबरे,गुलाब काचोळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

वाकी-पाईट गटातील सार्वजनिक व व्यक्तीगत योजनांचे प्रभावी अंमलबजावणी मध्ये लोकप्रतिनिधी इतकेच अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे आहे. आमच्या सकारात्मक भुमिकेमुळे प्रशासन नेहमीच सक्रिय राहिले त्यामुळेच आदिवासी महिला असुनही सुरेखा ठाकर यांनी सर्वाधिक कामे आपल्या गटात मार्गी लावली असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व भाजपाचे नेते शरद बुट्टेपाटील यांनी रोहकल (ता.खेड) येथे सांगितले. 

वाकी पाईट गटातील जेवढ्या लाभार्थ्यांचे वैयक्तिकरित्या लाभाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेत आले असता सर्वच्यासर्व प्रस्ताव मंजूर करण्याचे काम आतापर्यंत केलेले असून यापुढे शिलाई मशीन, पीठगिरणी,लोखंडीस्टोल,सायकली,मिरची कांडप,पिकोफोल मशीन,पीव्हीसी पाईप,सौरकंदील,कडबाकुट्टी आदीं वैयक्तिक लाभाचे प्रस्ताव दाखल करा सर्व प्रस्ताव जिल्हा परिषदेत मंजूर करण्याचे काम शरद बुट्टेपाटील यांच्या प्रयत्नाने केले जाईल असे सुरेखा ठाकर यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले. सुरेखा ठाकर व शरद बुट्टेपाटील यांनी जिल्हा परिषदेकड़ून रोहकल गावात गेल्या ५ वर्षात दीड कोटी रुपयांची कामे केली आहेत असे  उपसरपंच दिलीप काचोळे यांनी  बोलताना सांगितले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिनेश ठाकूर यांनी केले.