ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक- धनजंय मुंडे

चाकण, दि. १२ (चंद्रकांत मांडेकर ) - महागाई वाढली, शेतकरी आत्महत्या करतोय, जनधन योजनेचा फज्जा उडाला, काळा पैशाचे काय झाले, शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही, राज्यातील जनतेला टॅकरने पाणी, भीषण दुष्काळ हे सर्व प्रश्न निर्माण झाले असताना मोदींचे अच्छे दिन गेले कुठे ? असा सवाल करून अच्छे दिनच्या नावाखाली पंतप्रधान मोदींनी जनतेला फसवल असल्याची खरमरीत टीका भाजपसेना युती सरकारवर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी वाघू (ता.खेड) येथे केली. 

जिल्हा परिषद शाळेतील १ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून पश्चिम विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार दिलीप मोहिते, पंचायत समितीचे सभापती सुरेश शिंदे, बाजार समितीचे सभापती विलास कातोरे, उपसभापती अशोक राक्षे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मोहिते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, युवक तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, मंगल चांभारे, माजी सभापती शांताराम चव्हाण, अरुण चांभारे, रमेश राळे, बाजार समिती संचालक चंद्रकांत इंगवले, धैर्यशील पानसरे, वैभव घुमटकर, विलास मांजरे, सचिन शिळवणे, साळूबाई मांजरे, महंत बालकनाथ महाराज, शांताराम देशमुख आदी मान्यवरांसह परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. 

भाषणात ते पुढे म्हणाले, सतत चार वर्ष पेरलं ते उगवलं नाही म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केली परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे काहीही नाही म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका युतीच्या सरकारने घेतली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नसेल तर शिवसेनेने सत्तेला लाथ मारून बाहेर पडावे परंतु सध्यातरी सेनेची अवस्था खूपच बिकट झाली असल्याचे सांगून मुंढे म्हणाले, युती सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून एकही चांगला निर्णय घेतला नाही ? राज्याच्या ६० टक्के भागात दुष्काळ पडलाय ? जनतेला टॅकरने पाणी हि ओळख राज्याची कधी पुसणार ? राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय ? शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून युती सरकारवर मुंढे यांनी चौफेर टीका केली. 

आपल्या भाषणात मोहिते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राला निधी नसून सगळा पैसा विदर्भात चालला आहे. सेना भाजपा पक्षामध्ये दररोज भांडत असल्याने त्यांची युती कधीही तुटू शकते आणि विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. आमच्या तालुक्यातील धरणाच्या जीवावर पूर्व भागच्या तालुक्यातील लोक सुखी झाले आणि तालुक्याचे लोकांना शेतीला व पिण्यासाठी पाणी नाही म्हणून दुख भोगत आहेत. मी १० वर्षात ३ हजार कोटी रुपये आणले मग आत्ताच्या आमदाराने किती निधी आणला ते सांगावे असा सवाल करून तालुक्यात जातीचे राजकारण आमदार गोरेंकडून केले जात असून त्यांना नीट बोलताही येत नसल्याची टीका आमदार गोरेंवर यावेळी मोहिते यांनी केली. तसेच गोरगरिबांच्या जमिनी लुबाडून मोठे झालेल्या आणि पश्चिम भाग माझा आहे असे म्हणणाऱ्यापासून सावध राहण्याचा सल्लाही मोहिते यांनी येथील जनतेला दिला.  

यावेळी कैलास सांडभोर, अरुण चांभारे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सुनील थिगळे यांनी केले तर आभार सभापती सुरेश शिंदे यांनी मानले.