ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या सात मुलींना अटक

शिरुर, दि. १४ (प्रतिनिधी) - लॉजवर वेश्या व्यवसाय करणाऱ्या सात मुलींना पोलिसांनी छापा टाकून अटक करण्यात आली. शिरुर आणि रांजणगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लॉज चालकासह तीन जणांवर कारावई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगीतले. हि कारवाई काल रात्री शिरुर येथील श्रेयस लॉजवर करण्यात आली.

याप्रकरणी सात मूली, लॉज चालक हरीष श्रीधर शेट्टी (रा.उडपी, कर्नाटक), कामगार रमण उत्तम चक्रवर्ती (रा. कलकत्ता), योगेश तुकाराम होले (रा.वाशिम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना शिरूर न्यायालय येथे हजर केले असता त्यांना दहा हजार रुपये दंड व जामीन मंजूर करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर सूरजनगर जवळ प्रमुख रस्त्यावर असणाऱ्या श्रेयांस लॉजवर काही तरूणी असभ्य वर्तन करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री हॉटेल श्रेयांस लॉजवर छापा टाकला. तेथे सात मुली व तीन पुरुषांना अटक करण्यात आली. 

हि कारवाई पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस, शिरूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर, पोलीस कर्मचारी नितीन गायकवाड, मंगेश ठिगळे, प्रकाश माने, राजू मोमीन, गुरु जाधव या पथकाने केली