ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वडगाव काशिंबेगमध्ये विकास कामे अंतिम टप्प्यात

वडगाव काशिंबेग, दि १६ मे.२०१६ (ज्ञानेश्वर खिरड) - आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग या गावामध्ये वडगाव फाटा ते गणपती मंदिर डांबरी रस्ता सुधारणेसाठी २० लाख आणि सभा मंडप बांधणेसाठी २० लाख रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. दिलीपराव वळसे पाटील यांचे प्रयत्नातून जिल्हानियोजन समिती अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे.

माजी सरपंच राम डोके आणि ग्रामपंचायत सदस्य अनिल मानकर आणि ग्रामपंचायत वडगाव काशिंबेग यांनी वेळोवेळी पाठपुरावे करून हा निधी मंजूर करून घेतला आहे.

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग याठिकाणी स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान असून त्याठिकाणी येणाऱ्या भक्तांना  खराब रस्त्यामुळे त्रास होत होता. तसेच काही महत्वाच्या कार्यक्रमांनिमित्त सभा मंडपाची गरज होती. विकास कामांना मिळालेल्या निधीमुळे रस्त्याचे काम चालू  असून सभा मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.