ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डिझेल चोरी प्रकरणी एकास अटक; एक फरार

चाकण, दि. १६ (प्रतिनिधी) -हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रक मधील डिझेलची संगनमताने दोघांनी चोरी केल्याप्रकरणी काल ( दि.१५ ) एकास अटक करण्यात आली तर अन्य एक जण फरार झाल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चाकण- शिक्रापूर रस्त्यावरील बहूळ (ता.खेड) गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर हा विचित्र प्रकार घडला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व पोलिस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली. 

विनायक देविदास काळे ( वय.२५ वर्षे,सध्या रा.सुपे)असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार त्रिंबक आगरे (रा.हपडसर,पुणे) हा फरार झाल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमनाथ गवारी(रा.फूलगाव,ता.हवेली) या ट्रक चालकांने या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण-  शिक्रपूर रस्त्यावरील बहूळ (ता.खेड) गावच्या हद्दीतील  एका हॉटेलसमोर रात्री पावने बारा वाजण्याच्या दरम्यान ट्रक चालक गवारी  हे  आपल्या ताब्यातील ट्रक उभी करून हॉटेलमध्ये गेले होते.त्यावेळी आरोपी काळे व आगरे यांनी संगनमताने ट्रकमधील बाराशे रूपये किंमतीचे वीस लिटर डिझेल चोरून नेले.त्यापैकी काळे या भामट्यास अटक करण्यात आली. तर त्याचा साथीदार आगरे हा फरार झाला आहे. 

पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीधर जगताप, पोलिस हवालदार अजय भापकर व त्यांचे अन्य सहकारी या प्रकरणी अधिक तपास करित आहेत.