ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविणार - अतुल देशमुख

चाकण, दि. १६ (प्रतिनिधी) - शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अखंडपणे पाठपुरावा करणार असून केंद्र व  राज्याबरोबरच ग्रामिण भागातील खेडोपाड्यात आणि वाड्यावस्त्यांवर भाजपाची ताकद निर्माण करणार असल्याचे अभिवचन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांनी येथे दिले.

अतुल देशमुख यांची भाजपाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरि सत्कार व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. भाजपाचे नेते शरद बुट्टे पाटील, बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर, युवती आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस व मेदनकरवाडीच्या सरपंच प्रियांका मेदनकर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, माजी उपाध्यक्ष राजनभाई परदेशी, खेड पंचायत समितीचे सदस्य अमृत शेवकरी,राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेविका संपदा सांडभोर,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सुप्रिया मुळूक,चाकण शहराच्या अध्यक्षा भारती देशमुख, शहर अध्यक्ष सतिश धाडगे,ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाबराव खांडेभराड,माजी सरपंच रामदास मेदनकर,सरचिटणीस सुर्यकांत मुंगसे,किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक- अध्यक अँड. किरण झिंजुरके,उद्योजक सुनिल देवकर, युवती आघाडीच्या अध्यक्षा सारिका इंगळे,विद्यार्थीनी आघाडीच्या अध्यक्षा विजया तोडकर,राजेंद्र खरमाटे,भागवत आवटे,अमोघ धाडगे,सचिन लांडगे,किरण टिळेकर,संदेश जाधव,सचिन सोळंकर,पांडूरंग वहिले,शंकरराव कुर्हाडे,आकाश जोशी,दिनेश घुले आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच भाजपाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

प्रारंभी सरपंच प्रियांका मेदनकर ,भारती देशमुख व विजया तोडकर यांच्या हस्ते अतुल देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, गाव तेथे भाजपची शाखा सुरू करणार असून,पक्षाच्या माध्यमातून गावोगावी भाजपाचे कमळ फुलविण्याचा प्रयत्न करणार आहे. तरूण कार्यकर्त्यांचे संघटन करून त्यांना योग्य प्रशिक्षण देवून केंद्र व राज्य सरकारच्या योजना कशाप्रकारे लोकांपर्यंत पोहविता येतील याकरिता त्यांना प्रोत्साहन दिले जाईल.सामाजिक काम करताना कार्यकर्त्यांनी राजकिय जोडे बाजूल ठेवून पक्षाची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.पालकमंत्री गिरीष बापट व जिल्हा अध्यक्ष बाळा भेगडे यांच्या नेतृत्त्वाखाली खेड तालुक्याचा विकास हाच भाजपचा ध्यास राहिल असे देशमुख यांनी  शेवटी सांगितले. 

बाळासाहेब नाणेकर यावेळी म्हणाले सत्तेत राहून जर आंदोलन करावे लागत असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.शरद बुट्टे पाटील, अमृत शेवकरी,कालिदास वाडेकर, सुनिल देवकर, विजया तोडकर,संपदा सांडभोर,राजन परदेशी आदींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून,अतुल देशमुख यांचे कौतूक केले.

संदेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा.राजेंद्र खरमाटे यांनी सुत्रसंचालन केले.भारती देशमुख व सुप्रिया मुळूक यांनी स्वागत केले.अँड. किरण झिंजुरके यांनी आभार मानले.