ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचे मृतदेह सापडले

आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावातील घटना
रांजणी, दि.23 (प्रतिनिधी) -आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावात पोहण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या दोन मावसबहिणींचे मृतदेह आढळून आले. नागापूरच्या हद्दीत मुळेवस्तीवर तलावात रविवारी संध्याकाळी त्यांचे मृतदेह तरंगताना आढळले.
योगिता संदीप वाघ (वय 16) ही शिंगवे या ठिकाणी 12 वीत शिकत होती आणि रुपाली संपत वाघ (वय 15) ही मुलगी रांजणी या ठिकाणी दहावीत होती. नात्याने या दोघी एकमेकींच्या सख्या मावस बहिणी होत्या. रविवारी (दि.22 मे) सुट्टीच्या दिवशी दुपारी 2 ते 2.30 दरम्यान उन्हामुळे खुप गरम होत होते म्हणून घराशेजारील तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या, त्या परत आल्याच नाही. त्यांचा भाऊ हषवर्धन हा संध्याकाळच्या अंदाजे 5 ते 5.30 वाजताचे दरम्यान तलावावर जनावरे पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला असता त्यावेळेस त्याला बहिणींचे मृतदेह तलावात तरंगताना दिसले. लगेच त्याने वडिलांना आणि ग्रामस्थांना  बोलावून पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. पोहताना त्यांच्या डोक्याला मार लागून खोल जखमा झाल्या आहेत. त्यामुळे हा अपघात होता की घातपात या बद्दल चर्चा सुरू आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.