ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाबळे यांचा अपघातात मृत्यू

लांडेवाडी, दि. 24 (प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे सावली अंध अपंग संघटणेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बबन वाबळे यांचा अपघाती मृत्यू झाला तर चालक आणि एक सहप्रवासी जखमी झाले आहेत.
सोमवारी संध्याकाळी 6 वाजता खाजगी चारचाकी गाडी क्र. एमएच 14 सीएच 2808 या गाडीने घोडेगाव वरुन मंचरला येत असताना भैरवनाथ मंदिर लांडेवाडी या ठिकाणी अपघात  झाला. या अपघातात राजेंद्र वाबळे (वय 45 रा खडकी .पिंपळगाव .ता.आंबेगाव .जि.पुणे) हे जागीच ठार झाले. तर आणखी एक प्रवासी व चालक जखमी झाला आहे. 
प्रहार क्रांती आंदोलनचे कार्यकर्ते आणि सावली अंध अपंग सघटनेचे संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात आमदार बच्चू कडु यांच्या नेतृत्वाखाली वाबळे यांचे कार्य समाजामध्ये मोलाचे व प्रेरणादायी होते. आणे येथील मतिमंद व अपंग मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवुन शाळेतील मुख्याध्यापक,कर्मचारी व संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामध्ये त्यांनी मोठा संघर्ष केला. यापूर्वी मंचर घोडेगाव हायवेवर बरेच अपघात झाले असून यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी प्रशासनाकडे रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.