ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

चतुर्थीनिमित्त मोरया अर्धपीठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

वडगाव काशिंबेग दि. 26 (प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग या गावामध्ये काल संकष्टी चतुर्थीचे दिवशी स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक खेडे गाव आहे. ह्या गावामध्ये बर्‍याच वर्षांपासून डोंगरावरती स्वयंभू गणरायाची सोंड आहे. तसेच ते एक जागृत देवस्थान आहे. दर संकष्टी चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. चतुर्थीच्या दिवशी आजू बाजूच्या गावातील, तालूक्याती भाविक लोक देव दर्शनासाठी येत असतात. तसेच प्रत्येक दिवशी मंदिरात रोज सायंकाळी 7.00 वाजता श्रींची आरती घेतली जाते. तसेच श्री क्षेत्र भिमाशंकराला जाणारे भाविक भक्त हे देखील श्रींचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग या गावामध्ये येतात. अष्टविनायक दर्शनामध्ये या स्वयंभू मोरया गणरायाचे सोंडेचे दर्शन घेतल्यानंतरच अष्टविनायक दर्शन पूर्ण होते असे मानले जाते. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग या गावामध्ये देव दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी भक्त निवासचे नवीन बांधकाम करण्यात आले आहे. या गावा मध्ये आता नवीनच श्री राम मंदिराचे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात  दर महिन्याचे चतुर्थीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते.