ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महाळुंगे पडवळमध्ये टेलिफोन एक्सचेंज कार्यालयात आग; दूरध्वनी सेवा विस्कळीत

महाळुंगे पडवळ दि. 31 (प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ या गावामध्ये शनिवारी बी.एस.एन.एल. टॉवर शेजारील टेलिफोन एक्स्चेंज ऑफिसला अचानक दुपारी 1 च्या सुमारास मोठा स्फोट  होऊन आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
या आगीमध्ये ऑफिसमधील बँकसाठी असणार्‍या बॅटरी फुटल्या. त्या ठिकाणी असणार्‍या वायरिंगही पूर्णपणे जळाल्या. येथील रहिवाश्यांनी लगेचच पाण्याने आग विझवून आटोक्यात आणली. 
या घटनेमुळे बी.एस.एन.एल ची सेवा दिवसभर विस्कळीत झाली होती. फोन पूर्णपणे बंद झाले होते. त्यामुळे बी.एस.एन.एल ग्राहकांना खुप मोठा मनस्ताप झाला.