ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सुदुंबरेतील खुन प्रकरणातील आरोपीला अटक

खुनाचे कारण अस्पष्ट
सुदुंबरे, दि. ३ (प्रतिनिधी) - मागील महिन्यामध्ये मावळातील सुदुंबरे गावाजवळ प्रात: विधीसाठी गेलेल्या दोन लहान मुलींवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाल होता तर एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली असली तरी हा हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट केले नाही.

महेंद्र ऊर्फ कुमार दत्तू तळपे ( वय २४, रा. वाशिरे तळपेवस्ती ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदुंबरे गावाच्या हद्दीत २१ मे रोजी ऋतुजा कुसुमकर( वय १४ ) व पायल जगताप ( वय ७) या दोघी सकाळी प्रात:विधीसाठी ओढ्याकाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यावर महेंद्र याने धारदार शस्त्राने वार केले होते.   

या घटनेत पायल जगताप हिचा मृत्यू झाला होता. तर ऋतुजा कुसुमकर हिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जलद तपास लावण्यासाठी पथक तयार करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांना सूचना केल्या होत्या. 

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावात साध्या वेशात फिरून गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती काढली. त्यानंतर महेंद्र उर्फ कुमार दत्तू तळपे (वय २४ ) याला तळपेवस्ती येथून शिताफीने ताब्यात घेतले. आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या दोन्ही मुलींवर वार केल्याचे कबुल केले. मात्र हल्ल्यामागचे नेमके कारण पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.