ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देहूरोड येथे विवाहितेची आत्महत्या

देहूरोड, दि. १० (प्रतिनिधी) - चिंचोली येथील एका विवाहित महिलेने राहत्या घरामध्ये ओढणीच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना आज सकाळी आकराच्या सुमारास उघडकीस आली.

पोर्णीमा मंगेश शिंदे (वय-३५ रा. चिंचोली, दोहूरोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्णीमा हिचे पती आणि तिची बारा वर्षांची मुलगी कोकणातील लांजा येथे गेले असून ति घरामध्ये एकटीच होती. आज सकाळी ती घरकाम करण्यासाठी बाहेर आली नसल्याने शेजाऱ्यांनी तिच्या घराचा दरावाज ठोठावला. परंतु आतुन काहीच प्रतिसाद आला नाही. शेजाऱ्यांनी घराचा दरावाजा तोडून आत प्रवेश केला असता तिने छताच्या हुकाला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. तिच्याजवळ चिठ्ठीही सापडली नसल्याने तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.