ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आंबी येथील कृषी महाविद्यालयात कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन

वडगाव काशिंबेग, दि. 13 (प्रतिनिधी)- वडगाव काशिंबेग येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी आणि ग्रामपंचायत वडगाव काशिंबेग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आयोजित केले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथील पदवीपूर्व शिक्षण घेत असलेल्या सातव्या सत्रातील विद्यार्थी / विद्यार्थीनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.भगत, ग्रा.कृ.का.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.एच.टी.डुंबरे यांच्यासोबत त्यांचे विद्यार्थी अक्षय भोई, मंगेश चिकने , वैभव ढेरंगे, डी.साई किरण,अर्जुन फुंदे, जी.साई कृष्णा, पी.शिवानंद रेड्डी  शुभम शिवतरे  हे सर्वजन पाच महिने वडगाव काशिंबेग येथे वास्तव्यासाठी आलेले आहेत.
या कालावधीमध्ये हे विद्यार्थी गावातील निवडक शेतकर्‍यांच्या शेतीपूरक बाबींचा अभ्यास करणार आहेत. विस्तार शिक्षणाचा भाग म्हणून समाज विकासाचे विविध उपक्रम राबविणार आहेत. त्यासाठी गावात प्रात्याक्षिके, गटचर्चा, व्याख्याने, शेतकरी शास्रज्ञ चर्चा ,भेटी, जनावरांचे लसीकरण, आरोग्य व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, महिला मेळावा, शेती दीन, तसेच कृषी विषयक प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. तरी ज्या शेतकर्‍यांना आपली शेती चांगली कशी करता येईल, योग्य वेळी खत पाणी कसे व किती वापरावे, असे सर्व मार्गदशन वडगाव काशिंबेग याठिकाणी कृषी कार्यक्रमात मिळेल.